पुढचा अभ्यासक्रम:
विक्री व विपणन करार

संध्याकाळी 0७:00 ते 0९:00 वाजता

आमच्या "काल आज उदया" या पुस्तकाची प्रत मिळविण्यासाठी. कृपया संपर्क करा / डाउनलोड करा

  • कृषि परिषद सोबतचा पत्रव्यवहार
  • ईस्राईल कृषि अभ्यास दौरा ई-माहिती पत्रक
  • कृषि रोजगार
  • सभासद व्हा
  • कोरोना आपातकालीन मदत निधि

आमच्या विषयी

कृषि व पदवीधर संघटना हि महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषि व संलग्न पदवीधरांनी, पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहे. महाराष्ट्र शासन सोसायटी नियम १८६० व चॅरिटेबल ट्रस्ट कायदा १९५० या नुसार संचालक मंडळ व संस्थेतील सदस्य पदाधिकारी कार्यरत आहेत. विद्यार्थी संघटनांच्या तत्कालीन ज्वलंत प्रश्नांच्या माध्यमातून या संस्थेचा जन्म झाला असून, कृषि पदवीधर संघटनेतील देणगीदार सदस्य हे पूर्ण वेळ तसेच स्वयंसेवक पदाधिकारी म्हणून कार्यरत असतात.

या संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्टे:
  • संस्थेच्या सदस्यांसमोर पदवीधर बांधवांसमोर उभे राहणारे शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, उद्योजकीय प्रश्न सोडवणे.

  • कृषि आणि उद्योगात तांत्रिक मार्गदर्शन करणे

  • शेतकऱ्यांच्या धोरणात्मक प्रश्नात कृषि पदवीधर बांधवांच्या माध्यमातून सहभाग घेणे

  • कृषि क्षेत्रात नवनवीन कृषि व पर्यावरण विषयक पूरक उपक्रम, विविध प्रशिक्षणे राबवणे

संस्थापकांचा संदेश

Mr-Mahesh-Kadus

श्री. महेश कडूस पाटील

संस्थापक आणि अध्यक्ष.

कृषि व पदवीधर संघटना आणि उद्योगभारती हि कृषि आणि उद्योजकता क्षेत्रात पदवीधरांच्या माध्यमातून आमूलाग्र बदल घडवून आणणारी राज्यातील सर्वोच्च संघटना आणि संस्था आहे.

हि एक प्रकारची चळवळच आहे, त्याचे विविध विभाग यांच्या माध्यमातून कृषि आणि पूरक क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करणे आणि उद्योजकतेचा व स्वयंरोजगाराचा विकास करणे हे संस्थेतील सर्व घटकांचे ध्येय आहे. विद्यार्थ्यां करता रोजगार, ऍग्रीकल्चर कोर्पोरेट्स करता विविध सेवा देण्यात आम्ही आजही अग्रेसर आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.

तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शिवारात आणि उद्योजकाच्या हातात पोहोचले पाहिजे या करता आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्यक्रम महाराष्ट्रात आम्ही राबवित आहेत, विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभार्थीना लाभ मिळवून देणे हे कार्य गेल्या पाच वर्षात संस्थेने उत्तमरीत्या पार पडले आहे.

कृषि व संलग्न क्षेत्राचा आणि उद्योजकतेचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने या पुढे हि आमचे स्वयंसेवक आणि कर्मचारी कार्यरत राहतील.

आगामी कार्यक्रम २०२०

७ जून २०२०-२०२१

युवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा.

संपर्क करा - ९९२२३२१५५५.

कृषि पदवीधर संघटना याही वर्षी राज्यस्तरीय युवा प्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा आयोजित करीत आहे, या सोहळ्याचे हे ८ वे वर्ष आहे. राज्यस्तरीय सोहळा हा दिनांक ७ जून २०२० रोजी पार पडणार आहे. पुढील प्रमाणे विविध विभागात दरवर्षी प्रस्ताव स्वीकारले जातात.

राज्यातील – प्रयोगशील शेतकरी - कृषिउद्योजक, पर्यावरण-जलनिसर्गसंवर्धन, युवासंघटन, महिलासक्षमीकरण, पत्रकारिता, कला, सामाजिककार्य, शिक्षणवसेवा, संशोधन, पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्यव्यवसाय, कलाक्रीडा, अकृषक उद्योग.

इत्यादी क्षेत्रात आपल्या भरीव योगदानाने समाजाच्या विकासात मोलाचा वाटा देणाऱ्या युवकांच्या, कार्यकरणाऱ्यांच्या कार्याच्या गौरव सलामी देण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये आपण देखील सहभागी होऊ शकता. सहभागी होण्याकरता दरवर्षीच्या ५ जुलै ते ५ एप्रिल पर्यंत कार्याचा प्रस्ताव स्वीकारला जातो.

नोंदणी करा
ऑक्टोबर २०२० - मे २०२१

ईस्राईल सह जॉर्डन अथवा इजिप्त कृषि अभ्यास दौरा

संपर्क करा - ७०३०७१३७१३.

दरवर्षी प्रमाणे दिनांक ५ ते ११ ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२० या कालावधीत ईस्राईल सह जॉर्डन व पॅलेस्टाईन या तिन्ही देशांचा कृषि अभ्यास दौरा आयोजित असून, दिनांक ५ मे ते ५ ऑगस्ट २०२० रोजी पर्यंत या ईस्राईल सह इजिप्त कृषि अभ्यास दौरा करता शेतकरीगट, उद्योजक, विद्यार्थी, ऍग्रोकॉर्पोरेट्स, ऍग्रोडीलर्स टूर्स यांची नोंदणी सुरु असेल, ऑक्टोबर २०२० च्या दौऱ्या करिता दिनांक १ सप्टेंबर २०२० प्रवेशाची अंतिम मुदत शेतकऱ्यांना सवलत म्हणून आहे. तसेच मे २०२१ च्या दौऱ्या करिता दिनांक १४ जुलै ते १४ डिसेंबर २०२० हि प्रवेशाची अंतिम दिनांक आहे. कृषि तंत्रज्ञान व कृषिपर्यटनयाचा अभूतपूर्व अनुभव म्हणजे उद्योगभारती या विभागाकडून आयोजित असलेला हा दौरा. महाराष्ट्रातून लोकप्रतिनिधी, ऍग्रोकोर्पोरेट्स आणि शेतकरीबांधव, कृषिउद्योजक महिलाभगिनी यात सहभागी आहेत. प्रथम येणाऱ्यास व पासपोर्ट असणाऱ्यास प्राधान्य. या दौऱ्याचे हे आठवे वर्ष आहे.

नोंदणी करा

प्रशंसापत्र