करिअरभारती

  • करिअरभारती हा त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील विविध सेवांमुळे अल्पावधीत राज्यभरात लोकप्रिय ठरलेला राज्य कृषि पदवीधर संघटनेचा पदव्युत्तर शिक्षण - प्रशिक्षण व सल्ला सेवा विभाग आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध नामांकित महाविद्यालये, प्रशिक्षकांचे आणि त्याच बरोबर या विभागाच्या व महाविद्यालयांच्या संयुक्त माध्यमातून ए बी एम (ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट) झाल्यावर प्लेसमेंट केलेल्या पदवीधरांचे आणि प्लेसमेंट देणाऱ्या कंपन्यांचे दोन्हींचे, जाळे करिअर भारती कडे उपलब्ध आहे. पदवीधर आणि उच्चशिक्षित कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षणाच्या विकासाला वाहिलेले स्वयंसेवकांचे करिअर भारतीचे राज्यभरातील संघटन तसेच शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन आजतागायत यशस्वी ठरलेले आहे. राज्यातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांत सुद्धा करिअरभारतीचा कर्तृत्वाचा ठसा उमटलेला आहे. विविध कृषि व संलग्न ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट च्या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण साठी ग्रामीण भागातील पदवीधरांना प्रवेश पूर्व व प्रवेश पश्चात सेवा देण्याचे कार्य करिअर भारती ने यशस्वी केले आहे ते हि मोफत..!!
  • पदवीधर विद्यार्थ्यांना मोफत सेवा. करिअर भारती द्वारे राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर यांना पदव्युत्तर शिक्षण म्हणजे ऍग्री एम बी ए किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी करता मोफत सेवा दिली जाते.
  • मोफत वेबिनार व सेमिनार. करिअर भारती द्वारे राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर यांना पदव्युत्तर शिक्षण घ्या पूर्वी त्याचे लाभ, त्याच्या मर्यादा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच ऍग्री - एम बी ए इत्यादी पदवी घेऊन काय संधी आहेत याचे प्रवेश पूर्वी मार्गदर्शन केले जाते.
  • राज्यातील सर्व ए बी एम च्या महाविद्यालयाची अचूक माहिती. करिअर भारती द्वारे ग्रामीण भागातील पदवीधरांना राज्यातील सर्व ए बी एम च्या पदव्युत्तर महाविद्यालयांची माहिती थेट समन्वयकांद्वारे मोफत दिली जाते. या मुळे कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा हि चिंता आपल्या कृषि व संलग्न पदवीधर मित्रांना राहत नाही.
  • प्लेसमेंट ची नैतिक जबाबदारी. आमच्या कडून म्हणजेच करिअर भारती कडून माहिती घेऊन प्रवेश निश्चित केलेल्या पदवीधरांना ए बी एम झाल्या नंतर कंपनी प्लेसमेंट ची जबाबदारी देखील आम्हीच घेतो.