उद्योगभारती
-
आंतराष्ट्रीय कृषि अभ्यास दौरे.
उद्योगभारती हा त्यांच्या कृषि व उद्योजकतेतील विविध सेवांमुळे अल्पावधीत राज्यभरात लोकप्रिय ठरलेला राज्य कृषि पदवीधर संघटनेचा उद्योजकता विकास प्रशिक्षण व सल्ला सेवा विभाग आहे. विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ्,सल्लागार, प्रशिक्षकांचे आणि त्याच बरोबर प्रशिक्षणातून घडवलेल्या यशस्वी उद्योजकांचे जाळे उद्योगभारतीकडे उपलब्ध आहे. पदवीधर आणि उच्चशिक्षित कर्मचारी तसेच उद्योजकता विकासाला वाहिलेले स्वयंसेवकांचे राज्यभरातील संघटन कार्यक्रमांचे आयोजन आणि पूर्ततेत आजतागायत यशस्वी ठरलेले आहे. राज्यातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांत सुद्धा उद्योगभारतीचा कर्तृत्वाचा ठसा उमटलेला आहे. विविध प्रशिक्षणे आणि उद्योजकांना सल्ला सेवा हे मुख्य कार्य उद्योगभारतीने राज्य भारत यशस्वीपणे केलेले आहे.
-
शासन पुरस्कृत प्रशिक्षणे.
शासन पुरस्कृत कौशल्य विकास कार्यक्रम व विविध शासन पुरस्कृत प्रशिक्षणे उद्योगभारती मार्फत राबवली जातात. बेरोजगार व युवकांनीं अशा प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. राज्यशासन पुरस्कृत प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व केंद्र शासन पुरस्कृत पर्यावरण व वनमंत्रालयाची वृक्षलागवड योजना उद्योगभारती मार्फत राबवली जाते.
-
एक दिवसीय कार्यशाळा.
कृषि व इतर उद्योगातील उद्योग उभारणीची विद्यार्थी आणि नाव उद्योजकांना ओळख व्हावी, त्यातील प्रशिक्षक तसेच यशस्वी उद्योजकांसमवेत त्यांना अनुभवाची देवाण घेवाण करता यावी आणि त्यांच्या व्यवसायाची निवड आणि दृष्टिकोन पक्का व्हावा म्हणून पोल्ट्री, डेअरी, मोबाईल रिपेअरिंग, इम्पोर्ट एक्स्पोर्ट अशा विविध विषयांवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन उद्योगभारती मार्फत केले जाते.
-
इतर प्रशिक्षणे.
उद्योगभारती मार्फत एक दिवसीय कार्यशाळां व्यतिरिक्त एक आठवडे ते महिना कालावधी पर्यंतची उद्योजकता विकासावर आधारित प्रशिक्षणे घेतली जातात. यात व्यवसायाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल कसा बनवावा, प्रत्यक्ष त्या व्यवसायास भेट, विविध यशोगाथांचा अभ्यास आणि प्रशिक्षण नंतर बँकेच्या अथवा शासनाच्या योजनां मध्ये सहकार्य असे या प्रशिक्षणाचे स्वरूप असते. अशा प्रकारची प्रशिक्षणे बहुतांश खाजगी स्वरूपाची असतात.
↑