किसानभारती
-
किसानभारती हा त्यांच्या कृषि विषयक मासिकासह , इतर कृषक प्रकाशने व उद्योजकतेतील विविध यशोगाथांचे प्रकाशन या सेवांमुळे अल्पावधीत राज्यभरात कृषी उद्योजक आणि वाचक यांच्यात लोकप्रिय ठरलेला राज्य कृषि पदवीधर संघटनेचा कृषि प्रकाशन आणि कृषि माध्यम व प्रदर्शन विभाग आहे.
कृषि क्षेत्रातील क्षेत्रातील संशोधक, लेखक, जाहिरातदार कृषि कंपन्या, कृषि तंत्रज्ञ्, कृषि सल्लागार, प्रशिक्षकांचे आणि त्याच बरोबर यशस्वी उद्योजकांचे जाळे किसान भारती कडे उपलब्ध आहे. पदवीधर आणि उच्चशिक्षित कर्मचारी तसेच कृषि प्रकाशन व कृषि विकासाला वाहिलेले स्वयंसेवकांचे राज्यभरातील संघटन या मुळे किसान भारती चे प्रकाशन कार्य आजतागायत यशस्वी ठरलेले आहे. राज्यातच नाही तर राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांत सुद्धा किसानभारतीचा कर्तृत्वाचा ठसा उमटलेला आहे. विविध कृषक प्रकाशने हे मुख्य कार्य किसानभारतीने राज्य भरात यशस्वीपणे केलेले आहे.
↑