ईस्राईल कृषि अभ्यास दौरा.

जगाच्या पाठीवर २५७ देश आहेत, पण ईस्राईल हा एकमेव देश असा आहे कि ज्याचं कृषि तंत्रज्ञान संपूर्ण जगाने स्वीकारलंय. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा आणि जगात सर्वात कमी पाऊस पडणारा देश आहे तो म्हणजे ईस्राईल हा देश, पाण्याचं दुर्भिक्ष असणारा हा देश, चार हि बाजूंनी शत्रू ची आक्रमणे समर्थ पणे परतवून लावणारा आहे हा देश, तरी हि कृषि क्षेत्रात ऋषितुल्य ठरलेला हा एकमेव देश जगाच्या पाठीवर आहे. !! तेल अवीव सारखं जगातलं सर्वोत्कृष्ट शहर याच देशात आहे. मृत समुद्र ज्या वर माणूस हातपाय न हलवता हि तरंगतो तो समुद्र देखील ईस्राईल मध्येच आहे. सौंदर्य प्रसाधने, संगणक तंत्रज्ञान निर्मिती, लष्कराचं सामर्थ्य, जगातली बुद्धिमान मानस याच देशाने जन्माला घातलीत.अशा देशाचा अभ्यास करणं आणि त्या देशातल्या कृषि विषयक तंत्राला आपल्या शेतकऱ्याच्या शिवारात आणण याच हेतून सन २०१२ पासून उद्योग भारती ईस्राईल कृषि अभ्यास दौरा आयोजनात राज्यात अग्रेसर आहे.


 • कधी असतो हा दौरा? नोंदणी कशी करावी?

  दर वर्षी मे आणि ऑकटोबर महिन्यात हे दौरे असतात मे करता दार वर्षी १४ ऑगस्ट पासून आणि ऑकटोबर च्या ईस्राईल दौऱ्यां करता दर वर्षी १४ एप्रिल पासून ऍडव्हान्स प्रवेश नोंदणी उद्योग भारती मार्फत महाराष्ट्रभर सुरु असते. तंत्रज्ञानाच्या युगात आणि ऑनलाईन च्या जगात आता सर्व व्यवहार हे डिजिटल आहेत. शेतकरी आणि उद्योजक अथवा विद्यार्थी आपला प्रवेश आपण रोख रक्कम ऑनलाईन भरून निश्चित करू शकतात. उद्योग भारतीचे प्रतिनिधी आपल्या सेवेत हजर आहेतच. या व्यतिरिक्त हि आपल्या ला किंवा आपल्या शेतकरी गटाला अधिक माहिती हवी असल्यास ,इतर देशांचा सुद्धा कृषि अभ्यास दौरा आयोजित करायचा असल्यास उद्योगभारतीच्या बाणेर पुणे येथील कार्यालयाला देखील आपण चौकशी करू शकता अथवा भेट देऊ शकतात. केलेली नोंदणी हि रद्द करता येत नाही.


 • जाणून घ्या दौऱ्या विषयी.

  उद्योगभारती या उद्योजकता प्रशिक्षण विभागा तर्फे दर वर्षी मे आणि ऑकटोबर महिन्याच्या जवळपास ईस्राईल कृषि अभ्यास दौर्याचं आयोजन केलं जातं.याच बरोबर दर तीन वर्षांनी भरणाऱ्या ऍग्रीटेक या जागतिक कृषि प्रदर्शनातल्या सहभागी होणाऱ्या भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकरी,अभ्यासक,उद्योजक आणि कृषि पर्यटकांना ‘ईस्राईल कृषि अभ्यास दौरा व जागतिक कृषि प्रदर्शन भेट’ हि सेवा उद्योगभारती मार्फत दिली जाते. दर वर्षी मी मधील दौऱ्या करीत ऑगस्ट महिन्या पासूनच या दौऱ्याची आगाऊ प्रवेश नोंदणी शेतकरी बांधव आणि उद्योजकांना कडून उद्योगभारती कडे सुरु होत असते. २०१२, २०१६, २०१७, २०१८, २०१९ साली अशा प्रकारचा दौरा संस्थे च्या उद्योगभारती या विभागा तर्फे सातत्याने सलग आयोजित करण्यात आला होता यात आतापर्यंत महाराष्ट्रातून सुमारे ५०० प्रगतिशील शेतकरी व उद्योजक सहभागी झालेले आहेत.


  २०१२ च्या दौऱ्यात भाजपचे नेते नितीन जी. गडकरी व नाशिक पदवीधर चे आमदार सुधीर तांबे व संगमनेर च्या नगराध्यक्ष दुर्गा ताई तांबे यात सहभागी झालेले होते. मे २०१६ च्या नुकत्या झालेल्या दौऱ्यात सध्याचे पशु संवर्धन व दुग्ध विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांचा सहभाग होता. लोक प्रतिनिधींना सहभागी करून खऱ्या अर्थाने शेतकरी प्रशासनासोबत जोडणारी उद्योगभारती हि महाराष्ट्रात याच मुळे लोकप्रिय ठरली आहे.दौऱ्याच्या खास बाबीं म्हणाल तर ईस्राईलचे च नाही तर जॉर्डन किंवा पॅलेस्टाईन सारखे शेजारचे देश सुद्धा शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना कृषि अभ्यासाच्या अनुषंगाने दाखवले जातात. प्रत्येक वेळी वेळी पीक आणि गरज निहाय गट वेगवेगळे बनवले जातात आपल्या महाराष्ट्रात द्राक्ष व डाळिंबाचे फळबागांचे वाढते क्षेत्र विचारात घेऊन प्रत्येक दौऱ्यात डाळिंब, द्राक्ष आणि पाणी व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणावर उद्योगभारतीचा भर असतो. पाच ते सहा दिवस इस्राइल देशात हा अभ्यास सुरु राहतो. प्रत्येक शेतकऱ्याचं ईस्राईल हे स्वप्न उद्योगभारती ने आता पूर्ण केलं आहे.


  या दौऱ्यात एक नाही तर अनेक कृषि व पूरक उद्योग विषयक भेटी, शिवार फेऱ्या, तिथल्या यशस्वी शेतकऱ्यांशी आणि संशोधकांशी संवादाची संधी असते. ईस्राईल मधील गट शेती भेट, किबूत्झ हि गट शेतीची संकल्पना, दुष्काळावर मात करणाऱ्या इरिगेशन सिस्टिम्स, ईस्राईल ला भरघोस उत्पन्न देणाऱ्या कमी पाणी लागणाऱ्या खजूर वृक्षांचा अभ्यास यानंतर जगप्रसिद्ध मृत समुद्रास भेट, येशू ख्रिस्तांचे मृत्यू स्थळ असलेले जेरूसलेम या शहराला भेट, जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनी तसेच आपल्या महाराष्ट्राचा अभिमान असलेली जैन इरिगेशन कंपनी आणि ईस्राईल तसेच विद्यार्थी मित्रांसाठी जगातील प्रख्यात कृषि विद्यापीठ, तिथल्या विद्यार्थ्यांशी चर्चा आणि संवाद, वोल्क्यानी या विद्यापीठाला भेट, विद्यापीठातील कमी पाण्यावर विकसित केलेल्या फळबाग लागवड तंत्रज्ञानाचा अभ्यास, हरितगृहाच्या आधुनिक तंत्राचा अभ्यास, जगप्रसिद्ध वाईन उत्पादन अभ्यास व संबंधित प्रकल्पांना भेटी, इस्रायेल मधील सर्वात यशस्वी असणाऱ्या हॅचेरी व अंडी उत्पादक कंपनीस भेट, कुक्कुट उत्पादन आणि पोल्ट्री व्यवस्थापनाचा अभ्यास, यानंतर मत्स्य व्यवसाय व डाळिंब बाग व्यवस्थापन आणि उत्पादन तंत्राचा अभ्यास, गट शेतीतील उत्कृष्ट गट व त्यांच्या यशस्वी शेतकऱ्यांना भेटी, एवढंच नाही तर शेतात ट्रॅक्टर वर फिरण्याचा आनंद, कमी मनुष्य बळात चालणाऱ्या भव्य रोबोटिक डेअरीज, विद्यार्थ्यांनी संशोधनातून बनवलेली विविध कृषि उत्पादने, तिथली सहकारी तत्वावरची आधारित कुटुंब व्यवस्था, शेतकरी कुटुंबाबरोबर सवांद साधण्याची संधी सहभागी युवकांना व शेतकऱ्यांना या दौऱ्यात मिळते ईस्राईल चे समाज जीवन आणि संस्कृती चा अभ्यास, धार्मिक व तिथल्या सांस्कृतिक स्थळांना भेटी सुद्धा दिल्या जातात कारण जगभरातून अनेक लोक हि स्थळ पाहायला येतात, येशू चे जन्मस्थळ - मृत्युस्थळ अशा अनेक गोष्टींचा यात अंतर्भाव आहे. याच बरोबर या दौऱ्यात मनसोक्त पर्यटनाचा समावेश या साठीच आहे कारण आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला या दौऱ्यात जगातल्या पर्यटनाचा आनंद लुटता यावा. ज्यूंची सर्वात जास्त संख्या ईस्राईल मध्ये आहे, या ज्यू लोकांची निवासस्थाने प्राचीन भिंत, पवित्र चर्च पाहणे, रोमन रोड, नुसते ईस्राईल नाही तर पॅलेस्टाईन किंवा जॉर्डन मधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे म्हणजे येशूचे जन्मस्थळ किंवा रोमन थिएटर आणि हर्क्युलिस च मंदिर पाहणे, संपूर्ण ईस्राईल देशाला पाणी पुरवणारे गलेली चे समुद्र सदृश तळे, टीबेरीअस, आणि जगप्रसिद्ध कंपनी जीनोसार ची भेट, लहान उंचीच्या माया आणि रोट या जातीच्या आंबा लागवडीचे तंत्र, शेतीतील अत्याधुनिक मशिनरी व उपकरणांचा अभ्यास तसेच ऍव्होकॅडो, लीची, केळी यांचा तसेच विविध फळ बागांचा प्रत्यक्ष यांचा अभ्यास, तिबेरिया येथून शेख हुसेन शहर, जॉर्डन ची अमान राजधानी किंवा पॅलेस्टाईन शहर पर्यटन अशी दौऱ्याची वैशिष्ट्ये असतात, पहा मित्रांनो एक नाही तर कितीतरी गोष्टी या दौऱ्यात समाविष्ट असतात, आणि उद्योगभारतीचे हेच वैशिष्ट्य आहे, आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त देण्याचा आमचा प्रयत्न असतो.


 • या दौऱ्याचा नक्की फायदा काय?

  ऍग्रीकल्चर हे क्षेत्र आता पारंपरिक राहिलेले नाही, आता हि इंडस्ट्री नॉलेज बेस म्हणजेच ज्ञानावर आधारित आहे. अशा प्रकारचे जागतिक पातळीवरचे ज्ञान घेऊनच शेतकरी स्थानिक बाजारपेठेत आपले व्यावसायिक अस्तित्व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टिकवू शकतो. तंत्रज्ञान, कृषि ज्ञान, बिझनेस नेटवर्क, याच बरोबर दौऱ्याचे केले जाणारे सर्टिफिकेशन हे सर्वांच्या करियर ला नवी झळाळी आणि दिशा देणारे ठरते असा आमचा गेल्या पाच वर्षांचा अनुभव आहे,या सर्व गोष्टी आहेतच आणि या बरोबर कृषि पर्यटन आणि जागतिक पर्यटन चा आनंद देणारा दौरा म्हणजे उद्योग भारती चा ‘ईस्राईल कृषि अभ्यास दौरा’.


 • कृषि उद्योग, खत कंपन्या यांच्या स्पॉन्सरशिप संदर्भात.

  उद्योग भारतीच्या ईस्राईल दौऱ्यात काही नामांकित कृषि उद्योग समूह त्यांचे वितरक,खते आणि कृषि निविष्ठा विक्रेते सहभागी असतात, असे कृषि उद्योग आणि त्यांच्या ग्राहकांना सुद्धा या दौऱ्या करता सहभागी करून घेतले जाते. अशा प्रकारच्या कृषि उद्योगांचे त्यांना हवे असलेले ब्रॅण्डिंग सुंदर पद्धतीने उद्योग भारती मार्फत केले जाते. याचा निश्चितच आमच्या ग्राहक कृषि उद्योगांना अपेक्षे पेक्षा हि जास्त फायदा झालेला आहे.
सामान्य प्रश्न

ईस्राईल कृषि अभ्यास दौऱ्या बद्दल सामान्य प्रश्न

ईस्राईल कृषि अभ्यास दौरा कोणा साठी असतो? यात कोण सहभागी होऊ शकते?

शेतीची आणि शेतीच्या तंत्रज्ञानाची आवड असणारे कोणत्याही वयोगटाच्या व्यक्ती म्हणजे शेतकरी उद्योजक महिला किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकते. वय आणि शिक्षणाची अट यात नाही.

कमी वेळेत हा दौरा होणे शक्य होते का?

हो अगदीच. ईस्राईल हा इतर देशांच्या मानाने खूप लहान देश आहे. साधारण सात तासात आपण उत्तर ते दक्षिण या देशात फिरू शकतो.भारतातून ईस्राईल मध्ये पोहोचण्यास साधारण सात तास लागतात.

ईस्राईल दौऱ्यात सहभाग घेतल्या नंतर काय सुविधा यात प्रशिक्षणार्थ्याला मिळतात?

उच्च प्रतीचे प्रशिक्षण साहित्य व इस्रायली कृषि प्रशिक्षक.सकाळी केला जाणारा पाश्चात्य पद्धतीच्या नाष्ट्यासह,दुपारचे भारतीय जेवण,रात्रीच्या सहभोजनाचा आनंद. याच बरोबर प्रवासातला थकवा जाणवू हि न देणारी मर्सिडीझ ची वाहने,अत्याधुनिक सोयींनी युक्त विमान प्रवास. पासपोर्ट आणि व्हिजा करता मार्गदर्शन व सहकार्य. ईस्राईल कृषि अभ्यासा दरम्यान इस्रायली आणि हिब्रू तसेच इंग्रजी तुन प्रशिक्षकांनी दिलेले ज्ञान भाषांतर करून मराठी भाषेत उद्योगभारतीचे समन्वयक शेतकरी बांधवांना वेळोवेळी आणि ठीक ठिकाणी सांगतात. आपण मराठी अथवा इंग्रजीत जरी प्रशिक्षक आणि तंत्रज्ञान प्रश्न विचारले तरी दुभाषक आपल्याला भाषांतर करून देतात.

ईस्राईल कृषि अभ्यास दौऱ्यात काय शिकायला आणि पाहायला मिळते?

ईस्राईल कृषि अभ्यास दौऱ्यातील ८० टक्के भर हा कृषि व संबंधित अभ्यासावर असतो. उर्वरित २० टक्क्यात आपण त्या देशातील जगप्रसिद्ध असलेली पर्यटन स्थळे पाहतो. कृषि अभ्यासात विविध फळे डाळिंब,द्राक्षे, आंबा,केळी, विविध फळबागा या बरोबर ग्रीन हाऊस,पोल्ट्री,रोबोटिक डेअरी, ईस्राईल मधील पाणी व्यवस्थापन, तिथल्या गट शेती ची संस्कृती त्यांच्या यशोगाथा, कंपन्या आणि कृषि क्षेत्रात सर्व जगाने स्वीकारलेले आणि आगामी काळात येणारे ईस्राईली तंत्रज्ञान, व इस्राएली तंत्रज्ञ् यां सोबत चर्चासत्रे असा अभ्यासक्रम साधारणपणे असतो. याच बरोबर ईस्राईल चा जगप्रसिद्ध मृत समुद्र,जेरुसलेम शहर,विविध समुद्र किनारे, येशू चे जन्मस्थळ अशा ठिकाणी भेटी आयोजित केलेल्या असतात. ईस्राईल सह आपण शेजारील देश पाहण्याचा प्रयत्न करतो परंतु मुख्य कार्यक्रम हा ईस्राईल कृषि अभ्यास दौराच आहे. पॅलेस्टाईन किंवा जॉर्डन हि अतिरिक्त आकर्षणे आपल्या शेतकरी आणि पर्यटक गटाला पाहायला मिळावीत असा त्या मागे उद्देश आहे परंतु याला नियम अटी लागू आहेत.

आपण कृषि अभ्यास करता ईस्राईल ला कधी जायला हवे?

आपल्या कडील शेतीची कामे साधारणतः मे महिन्यात संपलेली असतात. ईस्राईल मधील शेती ची कामे फळ बागांचे हार्वेस्टिंग हे नोव्हेंबर मध्ये संपते. यामुळे मे आणि उशिरात उशिरा ऑकटोबर चा पहिला आठवडा हाच काळ जाण्यासाठी योग्य ठरतो. ज्या प्रवाशांना शेतकरी उद्योजक यांना मे चा दौरा शक्य नाही ते ऑकटोबर दौरा करिता निश्चित प्रवेश नोंदवू शकतात.

ईस्राईल मधील करन्सी काय आहे आणि सुरक्षितते बद्दल काय स्थिती?

ईस्राईल हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण आणि देश आहे. ईस्राईल ची करन्सी शेकेल आहे, एक शेकेल म्हणजे भारतीय साधारण २० रुपये. शेतकऱ्यांचे गट, महिला आणि पुरुष,लहान मुले कोणीही रात्री पहाटे दिवसा कधीही देशात निर्धास्त पणे पर्यटन व कृषि अभ्यास करू शकतात. ईस्राईल मध्ये पर्यटकांना कुठला हि धोका नसतो.आपल्या सामानाची आणि पैश्यांची जबाबदारी मात्र जगात कुठे हि गेलो तरी शेवटी आपलीच असते.

विशेष कागदपत्रे आणि लसीकरण आणि ड्रेस कोड ची आवश्यकता भासते का?

नाही .ईस्राईल मध्ये विशेष कोणत्या हि कागदपत्रे आणि लसीकरणाची आवश्यकता गरजेची नाही. काही धार्मिक स्थळी डोके टोपीने झाकायला लावतील तश्या प्रकारच्या टोप्या दिल्या जातात. परंतु भारतीय कपडे परिधान करून संपूर्ण देशात कुठे हि फिरायला अडचण नाही. वीष करता ग्रुप वीष असल्याने ऍडव्हान्स प्रवेश नोंदणी आवश्यक ठरते. या दौऱ्याची नोंदणी करताना पासपोर्ट आवश्यक नाही पण नोंदणी केल्या नंतर पासपोर्ट ३० दिवसांच्या आत उद्योगभारतीकडे जमा करणे आवश्यक आहे.

या दौऱ्यासाठी काही सरकारी अनुदान किंवा विशेष सवलत असते का?

नाही. उद्योगभारती आयोजित या दौऱ्याचे आयोजन संपूर्णतः खाजगी आहे. मित्रहो आपण आजारी पडल्या नंतर सरकारी दवाखान्यात जातो का ? नाही ना !! उद्योगभारतीचे दौरे अद्याप शासन पुरस्कृत नाहीत पण शासन कडून जर शेतकऱ्यांना किंवा गटाला अनुदान मिळत असेल त्यासाठी उद्योगभारती कडून काही सहकार्य हवे असेल सहभागी होताना आमच्या कडून कागदपत्रे अथवा बिले हवी असतील तर ते करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो.