२०१७ पासून उद्योगभारती या दौऱ्याचे वर्षातून एकदा च आयोजन करते. साधारण २४ जणांचा हा गट असतो. मर्यादित जागा आणि भरगच्च कृषि अभ्यास व सिक्कीम चे मनसोक्त पर्यटन हे या दौऱ्याचे वैशिष्ट्य आहे. मुंबई पासून हा दौरा सुरु होतो, मुंबई ते दिल्ली दिल्लीहून बागडोगरा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास असतो. यात छुपा खर्च कोणताही नसतो, विमानप्रवास, जेवण, चहा नाश्ता, स्थानिक भागात फिरण्यासाठी इनोव्हा सारख्या लक्झरी कार्स सर्व सोयी सुविधा यात उपलब्ध आहेत. दौऱ्यातील ठळक बाबी -
दर वर्षी जानेवारी च्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी च्या दुसऱ्या आठवड्यात हा ७ दिवसांचा दौरा आयोजित असतो. ५ ऑगस्ट पासून दार वर्षी पासून ऍडव्हान्स प्रवेश नोंदणी उद्योग भारती मार्फत महाराष्ट्रभर सुरु असते. तंत्रज्ञानाच्या युगात आणि ऑनलाईन च्या जगात आता सर्व व्यवहार हे डिजिटल आहेत. सेंद्रिय शेतीतील उद्योजक, शेतकरी आणि उद्योजक अथवा विद्यार्थी आपला प्रवेश आपण रोख रक्कम ऑनलाईन भरून निश्चित करू शकतात. उद्योग भारतीचे प्रतिनिधी आपल्या सेवेत हजर आहेतच. या व्यतिरिक्त हि आपल्या ला किंवा आपल्या शेतकरी गटाला अधिक माहिती हवी असल्यास, इतर राज्यांचा सुद्धा कृषि अभ्यास दौरा आयोजित करायचा असल्यास उद्योगभारतीच्या बाणेर पुणे येथील कार्यालयाला देखील आपण चौकशी करू शकता अथवा भेट देऊ शकतात. केलेली नोंदणी हि रद्द करता येत नाही.
निसर्ग-पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत जगभर ओरड सुरू असताना या विषयावर अचूक मात्रा घेत सिक्कीमसारख्या एका छोटय़ाशा राज्याने संपूर्ण राज्यात केवळ ‘सेंद्रिय शेती’चे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. या प्रकारची शेती करणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सिक्कीम हे ईशान्य भारतात हिमालयाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे राज्य. निसर्गसौंदर्याच्या या देणगीवरच या राज्याने पर्यटन क्षेत्रात मोठी झेप घेतली. ‘नेचर, कल्चर अॅण्ड अँडव्हेंचर’ हे ब्रीद घेऊन इथली अर्थव्यवस्था या पर्यटनावर उभी आहे. पण या पर्यटनाचा मुख्य स्रोत असलेल्या निसर्गाला गेल्या काही वर्षांमध्ये मोठा धोका उत्पन्न होऊ लागल्यावर या राज्याने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यातीलच एक पाऊल म्हणजे ‘सेंद्रिय शेती’चा प्रयोग. सिक्कीम सरकारने १५ ऑगस्ट २०१० रोजी ‘सिक्कीम ऑरगॅनिक मिशन’ची घोषणा केली. शेती, शेतकरी, ग्राहक, समाज आणि निसर्ग-पर्यावरण या साऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी ‘सेंद्रिय शेती’ हे सूत्र ठरविण्यात आले. यासाठी जनजागृती, कृती कार्यक्रम आणि अंमलबजावणी अशी दिशा ठरवली गेली. सर्व सरकारी विभाग, स्वयंसेवी संस्था, कृषी संलग्न विभाग, बाजारपेठ आणि मुख्य म्हणजे शेतकरी यांची एकत्रित यंत्रणा उभी करण्यात आली. यामुळे गेल्या पाच वर्षांत सिक्कीममध्ये बहुतांश शेतीने आपल्या भाळी आता ‘सेंद्रिय’ हे बिरूद लावले आहे.कुठल्याही प्रकारची रासायनिक खते, औषधे, कीटकनाशकांच्या वापरावर र्निबध, पारंपरिक निसर्गपूरक शेती पद्धती, प्रदेशनिष्ठ पिकांचीच निवड, बाह्य़ घटकांचा कमीतकमी वापर ही या ‘सेंद्रिय’ पद्धतीची वैशिष्टय़े आहेत.
सिक्कीमचे एकूण क्षेत्रफळ सात लाख २९ हजार ९०० हेक्टर एवढे आहे; पण त्यापैकी केवळ १०.२० टक्के म्हणजे ७४ हजार ३०३ हेक्टर एवढेच क्षेत्र शेती करण्यायोग्य आहे. कारण बाकीचे क्षेत्र जंगले, नैसर्गिक कुरणे आदींनी व्यापले आहे. भौगोलिक क्षेत्र कमी असले, तरी तेथे हवामानानुसार पाच कृषी विभाग आहेत. त्यापैकी बहुतांश क्षेत्र हे उष्णकटिबंधीय, अर्धउष्णकटिबंधीय आणि शीतपट्ट्यात येते. त्यामुळे मका, भात, गहू, बार्ली (अन्नधान्य पिके) उडीद (कडधान्य), सोयाबीन, मोहरी (तेलपिके) संत्री, पेअर्स, केळी, लिची, पेरू, सफरचंद (फळपिके), आले, वेलची, हळद (मसाला पिके), कंद पिके, वाटाणे, टोमॅटो, बटाटे, पालेभाज्या, मुळा, कोबी, कांदा (भाजीपाला), ऑर्किड्स, गुलाब, अँथुरियम, जर्बेरा, लिली (फुलपिके) अशी वेगवेगळ्या प्रकारची विविध पिके सिक्कीममध्ये पिकवली जातात.
सिक्कीमची संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून घोषणा झाल्यानंतर २०१६-१७ या वर्षात या राज्यात ८० हजार टन विविध भाजापाल्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात आले आहे. गेल्या वर्षी १८ जानेवारी २०१६ रोजी सिक्कीमची संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून घोषणा करण्यात आली. रासायनिक खते, कीटनाशकांच्या वापरावर निर्बंध, पर्यावरणपूरक शेतीवर भर, शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शेतमालाचे ब्रॅडिंग केल्याने सिक्कीममधील सेंद्रिय शेती फायदेशीर ठरली. येथील शेतीत भात, मका, लसूण, हळद, बकव्हीट ही प्रमुख पिके घेतली जातात. गेल्या वर्षी सेंद्रिय पद्धतीने ८० हजार टन भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येते. सेंद्रिय शेतीप्रती बांधिलकी जपत हे उत्पादन घेतले. भाजीपाल्याचे उत्पादन हे रसायनकमुक्त घेतले जात आहे. एकूण ७६,३९२ हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली प्रमाणित केले आहे. त्यापैकी १४ हजार हेक्टरवर सेंद्रिय पद्धतीने शेतपिकांची लागवड केली आहे. इथल्या स्थानिक बाजारपेठेलाही या सेंद्रिय उत्पादित शेतीमालाचे नियम लावण्यात आलेले आहेत. या शेतीमालाचे ‘ब्रँडिंग’ करत त्याचे बाजारमूल्य वाढवण्यावरही सरकारने भर दिला आहे. हरितक्रांतीनंतर अधिकाधिक उत्पादन मिळवण्याच्या उद्देशाने अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले. परिणामी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचा मोठा प्रश्न समोर आला. यासाठी पंजाबचं उदाहरण सर्वपरिचित आहेच. हा धोका लक्षात घेऊन १९३०च्या दरम्यान सेंद्रिय खतांची चळवळ सुरू झाली. भारतात खरंतर त्याआधीच सेंद्रिय शेतीचा प्रयोग झाल्याचे दाखले आहेत. परंतु त्याचा हवा तसा प्रचार झाला नाही. म्हणूनच रासायनिक खतांचा वापर सुरूच राहिला. याला सिक्कीम मात्र अपवाद ठरलं. याबाबतीत ते एक आदर्श राज्य म्हणून समोर येतंय. २०१५ पर्यंत संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचं 'मिशन' सिक्कीम सरकारने हाती घेतलं. आता ५८ हजार १६८ पैकी ८ हजार हेक्टर शेती सेंद्रिय म्हणून प्रमाणित आहे.
फळे, मसाला पिकांचे उत्पादन. उल्लेखनीय.
सिक्कीममध्ये १०० मेट्रिक टन चेरी पेपर्स, १०० क्विंटल किवी फळाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात आले आहे. त्याशिवाय वेलदोडे, आले, हळद, बकव्हीट पिके प्रायोगिक तत्त्वावर घेतली जात आहे.
२४ हजार शेतकरी करतात सेंद्रिय शेती.
सिक्कीमधील २८ शेतकरी संघटनांमधील २४ हजार शेतकरी सेंद्रिय पद्धतीने विविध पिकांचे उत्पादन घेत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी पणन यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकरी सहकारी सोसायटी स्थापन करण्यात आले.
सिक्कीमचे एकूण क्षेत्रफळ सात लाख २९ हजार ९०० हेक्टर एवढे आहे; पण त्यापैकी केवळ १०.२० टक्के म्हणजे ७४ हजार ३०३ हेक्टर एवढेच क्षेत्र शेती करण्यायोग्य आहे. कारण बाकीचे क्षेत्र जंगले, नैसर्गिक कुरणे आदींनी व्यापले आहे. भौगोलिक क्षेत्र कमी असले, तरी तेथे हवामानानुसार पाच कृषी विभाग आहेत. त्यापैकी बहुतांश क्षेत्र हे उष्णकटिबंधीय, अर्धउष्णकटिबंधीय आणि शीतपट्ट्यात येते. त्यामुळे मका, भात, गहू, बार्ली (अन्नधान्य पिके) उडीद (कडधान्य), सोयाबीन, मोहरी (तेलपिके) संत्री, पेअर्स, केळी, लिची, पेरू, सफरचंद (फळपिके), आले, वेलची, हळद (मसाला पिके), कंद पिके, वाटाणे, टोमॅटो, बटाटे, पालेभाज्या, मुळा, कोबी, कांदा (भाजीपाला), ऑर्किड्स, गुलाब, अँथुरियम, जर्बेरा, लिली (फुलपिके) अशी वेगवेगळ्या प्रकारची विविध पिके सिक्कीममध्ये पिकवली जातात. सिक्कीमची संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून घोषणा झाल्यानंतर २०१६-१७ या वर्षात या राज्यात ८० हजार टन विविध भाजापाल्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात आले आहे. गेल्या वर्षी १८ जानेवारी २०१६ रोजी सिक्कीमची संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून घोषणा करण्यात आली. रासायनिक खते, कीटनाशकांच्या वापरावर निर्बंध, पर्यावरणपूरक शेतीवर भर, शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शेतमालाचे ब्रॅडिंग केल्याने सिक्कीममधील सेंद्रिय शेती फायदेशीर ठरली. येथील शेतीत भात, मका, लसूण, हळद, बकव्हीट ही प्रमुख पिके घेतली जातात. गेल्या वर्षी सेंद्रिय पद्धतीने ८० हजार टन भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येते. सेंद्रिय शेतीप्रती बांधिलकी जपत हे उत्पादन घेतले. भाजीपाल्याचे उत्पादन हे रसायनकमुक्त घेतले जात आहे. एकूण ७६,३९२ हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली प्रमाणित केले आहे. त्यापैकी १४ हजार हेक्टरवर सेंद्रिय पद्धतीने शेतपिकांची लागवड केली आहे. इथल्या स्थानिक बाजारपेठेलाही या सेंद्रिय उत्पादित शेतीमालाचे नियम लावण्यात आलेले आहेत. या शेतीमालाचे ‘ब्रँडिंग’ करत त्याचे बाजारमूल्य वाढवण्यावरही सरकारने भर दिला आहे. हरितक्रांतीनंतर अधिकाधिक उत्पादन मिळवण्याच्या उद्देशाने अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले. परिणामी कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचा मोठा प्रश्न समोर आला. यासाठी पंजाबचं उदाहरण सर्वपरिचित आहेच. हा धोका लक्षात घेऊन १९३०च्या दरम्यान सेंद्रिय खतांची चळवळ सुरू झाली. भारतात खरंतर त्याआधीच सेंद्रिय शेतीचा प्रयोग झाल्याचे दाखले आहेत. परंतु त्याचा हवा तसा प्रचार झाला नाही. म्हणूनच रासायनिक खतांचा वापर सुरूच राहिला. याला सिक्कीम मात्र अपवाद ठरलं. याबाबतीत ते एक आदर्श राज्य म्हणून समोर येतंय. २०१५पर्यंत संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचं 'मिशन' सिक्कीम सरकारने हाती घेतलं. आता ५८ हजार १६८पैकी ८ हजार हेक्टर शेती सेंद्रिय म्हणून प्रमाणित आहे.
जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात.शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा ) रेशिम उद्योगातील टाकावू पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात. सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व पाणी धरुन ठेवण्याची क्षमताही वाढते. सेंद्रिय खतंमुळे स्फुरद व पालाश झाडांना विविध अवस्थेत उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांच्याद्वारे शोषली जातात. सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमिन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही. कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करुन देतात. सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यात रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अशा वेळी ट्रायकोडरमा नावाचे जीवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणा-या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
ऑरगॅनिक फार्मिंग किंवा ऍग्रीकल्चर हे क्षेत्र आता पारंपरिक राहिलेले नाही, आता हि इंडस्ट्री नॉलेज बेस म्हणजेच ज्ञानावर आधारित आहे. अशा प्रकारचे देश पातळीवरचे ज्ञान घेऊनच शेतकरी स्थानिक बाजारपेठेत आपले व्यावसायिक अस्तित्व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टिकवू शकतो. ऑरगॅनिक फार्मिंग मधील तंत्रज्ञान, कृषि ज्ञान, बिझनेस नेटवर्क, याच बरोबर दौऱ्याचे केले जाणारे सर्टिफिकेशन हे सर्वांच्या करियर ला नवी झळाळी आणि दिशा देणारे ठरते असा आमचा गेल्या पाच वर्षांचा अनुभव आहे, या सर्व गोष्टी आहेतच आणि या बरोबर सिक्कीम पर्यटन चा आनंद देणारा दौरा म्हणजे उद्योग भारती चा सिक्कीम सेंद्रिय शेती अभ्यास दौरा.
उद्योग भारतीच्या ईस्राईल दौऱ्यात काही नामांकित सेंद्रिय कृषि उद्योग समूह त्यांचे वितरक,खते आणि सेंद्रिय कृषि निविष्ठा विक्रेते सहभागी असतात, असे कृषि उद्योग आणि त्यांच्या ग्राहकांना डीलर्स ना सुद्धा या दौऱ्या करता सहभागी करून घेतले जाते. अशा प्रकारच्या कृषि उद्योगांचे त्यांना हवे असलेले ब्रॅण्डिंग सुंदर पद्धतीने उद्योग भारती मार्फत केले जाते. याचा निश्चितच आमच्या ग्राहक कृषि उद्योगांना अपेक्षे पेक्षा हि जास्त फायदा झालेला आहे.
सेंद्रिय शेतीची आणि शेतीच्या तंत्रज्ञानाची आवड असणारे कोणत्याही वयोगटाच्या व्यक्ती म्हणजे शेतकरी उद्योजक महिला किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकते. वय आणि शिक्षणाची अट यात नाही.
हो अगदीच. सिक्कीम प्रवास विमानाने केल्यास आठ तसंच कालावधी मुंबईतून सिक्कीम मध्ये पोहोचण्यास लागतो. हा दौरा सहा रात्री व सात दिवसांचा असतो.
उच्च प्रतीचे प्रशिक्षण साहित्य व सिक्कीम मधील सेंद्रिय शेतीचे अभ्यासक प्रशिक्षक. सकाळी केला जाणारा सेंद्रिय नाष्ट्यासह,दुपारचे सेंद्रिय जेवण, रात्रीच्या सहभोजनाचा आनंद. याच बरोबर प्रवासातला थकवा जाणवू हि न देणारी इनोव्हा कार सारखी वाहने, अत्याधुनिक सोयींनी युक्त विमान प्रवास. (विस्तारा एअरलाईन्स).
सिक्कीम सेंद्रिय शेती अभ्यास दौऱ्यातील ८० टक्के भर हा सेंद्रिय भाजीपाला फळे या अभ्यासावर असतो. उर्वरित २० टक्क्यात आपण त्या राज्यातील प्रसिद्ध असलेली पर्यटन स्थळे पाहतो.
जानेवारी ते फेब्रुवारी हाच सिक्कीम दौऱ्याकरिता योग्य कालावधी आहे. या कालावधीत बर्फ नसतो. फेब्रुवारी संपल्यावर मात्र बर्फ आणि वादळी पाऊस या मुळे प्रवास शक्य होत नाही. जानेवारी दौरा करिता निश्चित शेतकरी आपला प्रवेश नोंदवू शकतात.
नाही. उद्योगभारती आयोजित या दौऱ्याचे आयोजन संपूर्णतः खाजगी आहे. मित्रहो आपण आजारी पडल्या नंतर सरकारी दवाखान्यात जातो का ? नाही ना !! उद्योगभारतीचे दौरे अद्याप शासन पुरस्कृत नाहीत पण शासन कडून जर शेतकऱ्यांना किंवा गटाला अनुदान मिळत असेल त्यासाठी उद्योगभारती कडून काही सहकार्य हवे असेल सहभागी होताना आमच्या कडून कागदपत्रे अथवा बिले हवी असतील तर ते करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो.