युवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा


कृषि पदवीधर संघटना आयोजित


कृषि पदवीधर संघटना दर वर्षी राज्यस्तरीय युवा प्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा आयोजित करते. गेले ८ वर्षे अव्याहत पणे हा उपक्रम सुरु आहे. हा दिमाखदार राज्यस्तरीय सोहळा हा दिनांक ७ जून २०२० रोजी संस्थेच्या वर्धापन दिन निमित्त दर वर्षी पुणे येथे घेतला जातो. राज्यातील कृषि व सामाजिक विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्य केलेल्या सामान्य जनांचा गौरव व्हावा म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण महेश कडूस पाटील यांचे वैयक्तिक सामाजिक व राजकीय जीवनातील मार्गदर्शक लोकनेते खासदार प्रताप पाटील चिलखलीकर यांच्या प्रेरणेने 'युवा - प्रताप' असे पुरस्कार सोहळ्याच्या दिवसाचे नामकरण संस्थेने केले आहे. राज्यातील शेकडो शेतकरी, संघटनेचे संस्थेचे स्वयं सेवक व कार्यकर्ते पदाधिकारी आणि कृषि व संलग्न पदवीधर वर्धापन दिनाच्या निमित्ताने या सोहळ्यास आवर्जून उपस्थित असतात हे देखील या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.


पुढील प्रमाणे विविध विभागात दरवर्षी संस्थे कडून प्रस्ताव स्वीकारले जातात.
 • प्रयोगशील शेतकरी (द्राक्ष /डाळिंब इ.)
 • कृषि उद्योग व उद्योजक
 • पर्यावरण-जल अथवा निसर्ग संवर्धन
 • युवा संघटन
 • महिला सक्षमीकरण अथवा महिला उद्योजिका
 • समाजाभिमुख पत्रकारिता
 • कला साहित्य व क्रीडा
 • सामाजिक कार्य करणारे व्यक्ती व संस्था
 • शिक्षण, विविध संशोधन व सेवा
 • पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्यव्यवसाय इ.
 • अकृषक उद्योग
 • सोशल मिडिया वरील कृषि विस्तार कार्य

प्रस्ताव कसा पाठवावा
 • ऑन लाईन व ऑफ लाईन असे दोन्ही प्रकारे प्रस्ताव स्वीकारले जातात.
 • ऑन लाईन प्रस्तावाची प्रत agrigraduatesassociation@gmail.com वर पाठवावी.
  (स्कॅन किंवा पीडीएफ स्वरूपात)
 • ऑफ लाईन प्रस्ताव "प्रति - श्री भाऊसाहेब कडूस पाटील ( महासचिव , कृ . प . सं .), कृषि पदवीधर संघटना विभागीय कार्यालय, फ्लॅट ७, लेन ३, कर्नाटक बँकेजवळ, डी मार्ट मागे, बाणेर पुणे ४५ ". या पत्त्यावर पाठवावा.
 • प्रत्येक वर्षी प्रस्ताव करणारे व्यक्ती यांच्या कडून प्रस्ताव सह देणगी शुल्क स्वीकारले जाते. सादर देणगी शुल्क हे संस्थेच्या अधिकृत खात्यावरच स्वीकारले जाते. या देणगी शुल्कातून प्रत्येक वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक दृष्ट्या आवश्यक घटकांना जाहीर मदत केली जाते.

हा सोहळा म्हणजे आपल्या भरीव योगदानाने समाजाच्या विकासात मोलाचा वाटा देणाऱ्या युवकांच्या, कार्य करणाऱ्यांच्या कार्याच्या गौरव सलामी देण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये आपण देखील सहभागी होऊ शकता. सहभागी होण्याकरता दरवर्षीच्या ५ जुलै ते ५ एप्रिल पर्यंत कार्याचा प्रस्ताव स्वीकारला जातो.

स्पॉन्सरशिप्स संदर्भात.

या कार्यक्रमाचे व्यासपीठ हे राज्यपातळीवरील असल्याने, राज्यातील कृषि मंत्री, सचिव , अथवा विविध विभागांचे आयुक्त आणि राज्यभरातील प्रगतिशील शेतकरी या सोहळ्यास उपस्थित असतात. अनेक खत उत्पादक कंपन्यांना किंवा लघु उद्योगांना ब्रॅण्डिंग करण्यासाठी ची हि सुवर्णसंधी असते. याच बरोबर प्रयोजकांना व्यासपीठावरील मान्यवरांसह संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळते. या सर्व सोहळ्याचे प्रयोजकांची जाहिरात आणि त्यांच्या वयवसायाचे ब्रॅण्डिंग साधारण तीन महिने आधी पासून केले जाते. प्लॅटिनम, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ अशा चार विभागासह मिडिया आणि हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स सुद्धा आम्ही आमंत्रित करतो. अधिक माहिती साठी खालील पीडीएफ डाउनलोड करावी.