कृषि व पदवीधर संघटना

महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषि व संलग्न पदवीधरांनी, पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहे.महाराष्ट्र शासन सोसायटी नियम १८६० व चॅरिटेबल ट्रस्ट कायदा १९५० या नुसार संचालक मंडळ व संस्थेतील सदस्य पदाधिकारी कार्यरत आहेत.

विद्यार्थी संघटनांच्या तत्कालीन ज्वलंत प्रश्नांच्या माध्यमातून या संस्थेचा जन्म झाला असून,कृषि पदवीधर संघटनेतील देणगीदार सदस्य हे पूर्ण वेळ तसेच स्वयंसेवक पदाधिकारी म्हणून कार्यरत असतात. संस्थेच्या सदस्यांसमोर पदवीधर बांधवांसमोर उभे राहणारे शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, उद्योजकीय प्रश्न सोडवणे शासन दरबारी ते मांडणे कृषि व पूरक क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवणे व या बरोबरच शेतकरी बांधवाना कृषि व समस्त पदवीधरांच्या माध्यमातून कृषि आणि उद्योगात तांत्रिक मार्गदर्शन करणे, उद्योजकतेचा विकास करणे, तसेच शेतकऱ्यांच्या धोरणात्मक प्रश्नात कृषि पदवीधर बांधवांच्या माध्यमातून सहभाग घेणे आणि एकूणच कृषि क्षेत्रात नवनवीन कृषि व पर्यावरण विषयक पूरक उपक्रम, विविध प्रशिक्षणे राबवणे हि विचारधारा संस्थे द्वारे कार्यरत आहे.

संस्थेचे विविध विभाग हे उद्योजकता विकास प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय कृषि अभ्यास दौरे व कृषि आणि पूरक क्षेत्रात रोजगार निर्मितीस वाहिलेले आहेत. शेतकऱ्यांचे विविध गट, मंडळे गेल्या पाच वर्षात संस्थेने स्थापन केली आहेत. आंतरराष्ट्रीय कृषि अभ्यास दौऱ्यां करता शेतकऱ्यांचा आणि उद्योजकांचा विश्वास आम्ही सार्थ केलेला आहे. कृषि पदवीधर संघटना कृषि व संलग्न विषयांतील सर्व पदवीधर,पदविकाधारक, शेतकरी बांधवांकरिता राज्यात कृषि, प्रशिक्षण आणि उद्योजकता विकासात अग्रेसर पथदर्शी संस्था आहे. संस्थेच्या विविध विभागांच्या सेवा अल्पावधीत लोकप्रिय ठरल्या आहेत.

उद्योगभारती

Mr-Mahesh-Kadus

उद्योगभारती हा कृषि व पदवीधर संघटना द्वारा पुरस्कृत विभाग असून कृषि व उद्योजकता प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय कृषि व उद्योजकता अभ्यास दौरे व कॉर्पोरेट उद्योगांना प्रशिक्षण सेवा यात प्रामुख्याने कार्यरत आहे. हा विभाग विविध कृषि व उद्योजकता प्रशिक्षणे राबवणे विविध शासकीय कृषि व उद्योजकता संलग्न योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याकामी कार्यरत आहे.

महाराष्ट्र शासन मनुष्यबळ विकास मंत्रालय पुरस्कृत प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम सारख्या शासकीय योजना उद्योगभारती मार्फत पदवीधरांकरता राबवल्या जातात. दर वर्षी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालय पुरस्कृत वृक्ष लागवड योजना हि या विभागा मार्फत राबवली जाते. स्थानिक पातळीवर युवक, बेरोजगार, विद्यार्थी, शेतकरी यांना तसेच उद्योजकांना कृषि व संलग्न क्षेत्रात तांत्रिक मार्गदर्शक मित्र म्हणून हा विभाग काम करीत आहे. कृषि व संलग्न उद्योग प्रकल्पांना लघुउद्योजकांना प्रकल्प अहवाल बनवून देणे व प्रकल्प मार्गी लागण्याकरिता बँकां मार्फत आर्थिक साहाय्य मिळवून देणे तसेच उद्योजकांना खाजगी तत्वावर सल्ला व सेवा प्रदान करणे या सेवांसह विविध उद्योग पूरक विषयांवर एक दिवसीय कार्यशाळा तसेच दुग्ध व्यवसाय,शेळी पालन,ग्रीन हाऊस,पोल्ट्री, मधुमक्षिका पालन, कृषि उद्योजकता कार्यशाळा इत्यादी प्रशिक्षणे सातत्याने या विभागात आयोजित केली जातात. विविध कॉर्पोरेट उद्योगांना गरजे नुसार प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय कृषि अभ्यास दौरे यांची सेवा उद्योगभारती तर्फे देण्यात येते.