कृषि पदवीधर संघटनेच्या विभगा पैकी लोकसारंग बचत गट हा एक विभाग आहे, संस्थेतील सदस्यांकरिता लहान स्वरूपाचे मुदत कर्ज आता संस्थे द्वारे लघु उद्योगा करता दिले जाते.अल्प व्याजदरावर सामाजिक बांधिलकी जपत सदस्यांची आर्थिक गरज भागवणे व त्यांना उद्योग व्यवसायाकरिता प्रोत्साहन देणे हा उद्देश डोळ्या समोर ठेवून लोकसारंग मायक्रोफायनान्स आता आर्थिक सेवा देण्यात वाटचाल करीत आहे. १ ऑक्टोबर २०१७ ला या विभागाची स्थापना झालेली असून श्री. सुरज खोमणे या बचत गटाचे अध्यक्ष आहेत.